By  
on  

संतोष जुवेकरचा रावडी अंदाज असलेला 'अधम' सिनेमाचा ट्रेलर एकदा बघाच

संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. संतोषने मराठी सोबतच काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःच्या अभिनयाची छाप पडली. हा हरहुन्नरी अभिनेता लवकरच 'अधम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोषने याआधी 'स्ट्रगलर साला' या मराठी वेबसिरीजमध्ये सुद्धा अभिनय केला आहे.

श्री नटराज पिक्चर प्रस्तुत 'अधम' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात संतोष जुवेकर एकदम हटके अंदाजात पाहायला मिळत आहे. चांगल्या आणि वाईट लोकांमधला संघर्ष या ट्रेलरमधुन पाहायला मिळत आहे.

या सिनेमात किशोर कदम आणि शशांक शेंडे हे खलनायकी छटा असलेल्या व्यक्तिरेखा रंगवत आहेत. अभिनेत्री गौरी नलावडे सुद्धा या सिनेमात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिषेक केळकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा हटके सिनेमा २८ जून २०१९ रोजी सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=YMQEC4j8VkY

Recommended

PeepingMoon Exclusive