By  
on  

‘बिग बॉस मराठी 2’ च्या घरात गरम वातावरण थंड करण्यासाठी रंगल्या गाण्यांच्या भेंड्या

बिग बॉसच्या घरात चौथा दिवस जरा शांत होता. काल बिग बॉसच्या घरात रात्री सदस्य गार्डन परिसरात निवांत बसले होते. तेव्हा त्यांच्यात गाण्याचा भेंड्यांचा डाव रंगला.

यामध्ये शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, शिव ठाकरे, पराग कान्हेरे, माधव देवचके, दिगंबर नाईक, अभिजीत केळकर या सदस्यांनी सहभाग घेतला होता. यावेळेस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या सदस्यांमध्ये गाण्याच्या भेंड्यांचा डाव रंगला.

वैशाली माडे, अभिजीत बिचुकले, शिव ठाकरे, अभिजीत केळकर यांनी उत्स्फूर्तपणे गाणी गाऊन या खेळातली रंगत वाढवली. यावेळी आपल्या गायनाचा वेगळ्या शैलीने बिचूकलेंनी सर्वांचं मनोरंजन केलं. बिचूकलेंच्या गायनाच्या वेगळ्या शैलीने अभेजेत केळकर तर लोटपोट हसत होता.

यावेळेस 'जागे सारे रैना' हे गाणं गाताना अभिजीत केळकर आणि बिचुकले यांच्या डोळ्यांतून घरच्यांच्या आठवणीने पाणी आलं. परंतु क्षणभर सावरून पुन्हा एकदा या दोघांनी गाण्यांच्या भेंड्यांमध्ये भाग घेतला. यावेळेस सर्व सदस्यांनी 'ससा ओ ससा' या गाण्यावर डान्स सुद्धा केला.

अशाप्रकारे ‘बिग बॉस मराठी 2’ च्या घरातलं कालचं खेळीमेळीचं वातावरण अजून किती दिवस टिकणार हे लवकरच कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive