By  
on  

अमेय वाघने आपल्या 'गर्लफ्रेंड'सोबत साजरा केला 'चीट डे'

अमेय वाघच्या आगामी 'गर्लफ्रेंड' या सिनेमाची सिनेवर्तुळात जोरात चर्चा सुरु आहे. अमेय वाघ आपल्या या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अनेक हटके कल्पना सोशल मीडियावर लढवत आहे.

नुकतंच अमेयने आपल्या इंस्टाग्रामवरून त्याचा आणि सईचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ''गर्लफ्रेंड सोबत असेल तर डाएटचा संकल्प मोडला तरी चालतं.'' अशा आशयाची पोस्ट अमेयने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. याफोटोत अमेय फ्रेंच फ्राईस खाताना दिसत असून सई अमेयसोबत या फोटोत दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByKFNO7jRHr/

या सिनेमात अमेय वाघसोबत अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणार आहे. अमेय आणि सई हे पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. अमेय या सिनेमात नचिकेत ही व्यक्तिरेखा साकारत असून साई या सिनेमात अलिशा हे पात्र रंगवताना दिसत आहे. हा सिनेमा २६ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/Bx_rGFfD27m/

Recommended

PeepingMoon Exclusive