By  
on  

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये वैशालीने सांगीतला आपला संघर्षाचा काळ

'बिग बॉस मराठी 2’ च्या घरात पाचव्या दिवसाची सुरुवात नागीण डान्स या गाण्याने झाली. सर्वांनी सकाळचा आळस या धमाकेदार गाण्यावर डान्स करून झटकला. यावेळेस सकाळच्या चहाच्या वेळेस सर्व स्पर्धकांनी आपला संघर्षाचा काळ सर्वांसोबत मोकळेपणाने शेयर केला.

यावेळेस गायिका वैशाली माडेने तिच्या आयुष्याचा सुरुवातीचा खडतर काळ सर्वांसमोर व्यक्त केला. वैशालीचा घरच्यांना उंबरठ्याच्या आत शिरण्याची परवानगी नव्हती. त्यांच्यासाठी पाणी वैगरे घराबाहेर ठेवायचे. त्यामुळे पाणी वैगरे त्यांना बाहेरून प्यावं लागायचं.

वैशाली शेतामध्ये काम करायची. त्यावेळेस कामाचे पैसे घेण्यासाठी घराबाहेर उभं राहावं लागायचं. तेव्हा जमिनीवर फेकलेले पैसे उचलावे लागायचे. तेव्हा वैशालीला याची चीड यायची. तो आणि मी एकाच माणूस आहोत, आमचं रक्त एक आहे, तरी मला अशी वागणूक का मिळतेय, याची वैशालीला अत्यंत चीड यायची.

जेव्हा गायनाच्या अनेक स्पर्धा जिंकून जेव्हा वैशाली सुप्रसिद्ध झाली तेव्हा तिच्या गावाने तिचा सत्कार आयोजित केला. त्यावेळेस ज्या माणसाकडून वैशालीला सरुवातीच्या काळात हीन वागणूक मिळायची त्या माणसाने  वैशालीला घरी जेवायला बोलावलं. तेव्हा तो माणूस वैशालीला पाणी आणि जेवणासाठी आग्रह करु लागला.

त्यावेळेस वैशालीने त्या माणसाला सांगितलं, मला तुमच्या घरच काहीही नाकी. एकेकाळी तुम्ही जे मला हिणवलं होतं त्याच्या बरोबर विरुद्ध आज सगळं माझ्या आयुष्यात घडला आहे. त्यामुळे माणूस मी काय करू शकते हे दाखवायला मी आज तुमच्या समोर उभी आहे. मी व्यक्ती तीच आहे पण आता बदल मात्र तुमच्यात झाला आहे.

वैशालीच्या आयुष्यातला हा किस्सा ऐकताना सर्वजण थक्क होऊन गेले. ‘बिग बॉस मराठी 2’ च्या घरात यापुढे आणखी कोणती रंगात चढते हे पुढच्या काही भागांमध्ये बघायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive