By  
on  

लोकप्रिय पटकथालेखक उपेंद्र सिधये यांचे ‘गर्लफ्रेंड’ सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण

हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधयेगर्लफ्रेंडयासिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. “निर्मात्यांच्या प्रोत्साहनातूनगर्लफ्रेंडही कलाकृती तयार होऊ शकली”, असे मत त्यांनी सिनेमाविषयी बोलताना व्यक्त केले.

अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या पटकथालेखक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘दृश्यम’, ‘किल्ला’, ‘मांजा’ अशा लोकप्रिय आणि विविध धाटणीच्या सिनेमांसाठी त्यांनी पटकथा व संवाद लेखन केले.

'ह्यूज प्रॉडक्शन्स' आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुतगर्लफ्रेंडया चित्रपटात गर्लफ्रेंड शोधणाऱ्या मुलाच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अभिनेता अमेय वाघचे नाव निश्चित झाले होते. नंतर अलिशा या गर्लफ्रेंडचे पात्र ताकदीने पेलू शकेल अशा अभिनेत्रीची निवड करण्याची वेळ आली' तेव्हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नाव निश्चित करण्यात आले .

असा हटके विषय असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अमेय आणि सई हि नवी जोडी प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार, हे येत्या काही दिवसांत कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive