By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य करत आहेत गोव्याचा प्लॅन!

एकाच वेळी रागाने आकांडतांडव कसा करायचा आणि तोच राग शांत करून मनमोकळ्या गप्पा कशा माराव्यात हे बिग बॉसच्‍या घरातील सदस्यांकडे पाहून तुम्हाला कळून येईल. अशाच एका निवांत क्षणी शिव, पराग, वीणा आणि अभिजीत केळकर यांच्‍यामधील काही मजेशीर गंमतीजमतींची झलक बघायला मिळेल.

घरातील मंडळी गोव्‍यातील पराग कान्हेरेच्या हॉटेलमध्‍ये पार्टी करण्‍याची जंगी योजना आखताना दिसत आहेत. गप्‍पागोष्‍टीमध्‍ये वीणा मुद्दा मांडते की त्‍याचे हॉटेल मिरामारमध्‍ये आहे, म्‍हणून सर्वांना बागा बीचचा आनंद मिळू शकत नाही. यादरम्‍यान शिव परागची मस्‍करी करत म्‍हणतो, ''तिथे गेल्‍यावर आम्‍ही टॉवेलवर राहिलो तर प्रॉब्‍लेम होईल ना?' त्‍याला पराग प्रतिक्रिया देतो, 'तिकडे चालतं'.

तसेच तो पुढे बोलतो, 'मी तर धंदेवाईक आहे बाबा. जर तू टॉपलेस बिपलेस वर आलास ना तर मी हॉटेलच्या बोर्डच्‍या इथे फोटो काढून घेणार, माहिती आहे का. ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर –शिव ठाकरे.' यावर वीणा विचारते, 'ते तर मी होणार होते ना?' याबाबत पराग घोषणा करतो, 'मुलींसाठी ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर शिव ठाकरे, मुलांसाठी ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर वीणा... आडनाव काय लावू?'

पराग मस्‍करी करत बोलतो, 'तिचे आडनाव 'जगताप' म्‍हणून लावले तर.' हे ऐकताच वीणा मजेनेच लिव्हिंग रूमपर्यंत त्‍याचा पाठलाग करते. खरेतर परागच्‍या विनोदीशैलीने प्रत्‍येकाचा मूड उत्‍साहित केला आणि त्‍यांना अधिक उत्‍साहाने पार्टी साजरी करण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. 'बिग बॉस मराठी 2' अशाच मजेशीर गंमतीजमती तुम्हाला voot अॅप वर पाहता येतील.

Recommended

PeepingMoon Exclusive