By  
on  

जब मिल बैठेंगे तीन यार... ‘कॉफी विथ करण’मध्ये येतायत हे तिघे

‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन धमाकेदार ठरतो. या कार्यक्रमाचा आगामी सातवा सीझनसुध्दा असाच हटके आणि धम्माल असणार यात शंका नाही. या सीझनमध्ये करण अशा सेलिब्रिटींना एकत्र आणणार आहे, ज्यांना एकत्र पाहायला प्रेक्षक अगदी आतुर झाले आहे. या कार्यक्रमाचा प्रिमियर 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. दर रविवारी रात्री 9 वाजता ‘कॉफी विथ करण’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत करण म्हणतो, या सीझनमध्ये ब्लॅक कॉफी सर्व्ह करण्यात येईल.

इंग्रजी वर्तमानपत्र डीएनएच्या वृत्तानुसार दोन या कार्यक्रमानिमित्ताने बॉलिवूडचे दोन खान एकत्र येणार आहेत. एक किंग खान आणि दुसरा दबंग खान, आहे ना गंमत. पण आणखी गंमत तर पुढे आहे. कतरिना कैफसुध्दा दोघांसोबत या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे. त्यामुळे आता या तिघांना एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सलमान आणि किंग खान या दोघांसोबतच करणची नेहमीच छान गट्टी जमते. कतरिना किंग खानसोबत ‘झिरो’ सिनेमात काम करतेय तर प्रियंकाने ‘भारत’ सोडल्यानंतर सलमानसोबत ‘भारत’मध्ये कतरिनाची वर्णी लागली आहे. त्यामुळे सलमान आणि शाहरुख कतरिनाची कशी कार्यक्रमात मजा घेतायत, हे पाहायला धम्माल येईल.

‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात करणचे लाडके ‘धडक’ स्टार जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर येणार असल्याची माहिती येत आहे. तर एका भागात देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनससुध्दा उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तसंच बॉलिवूडचे नवीन लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनासुध्दा करण आमंत्रित करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive