By  
on  

पाहा, परिणीती- सिध्दार्थची ‘जबरियाँ जोडी’

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.‘जबरियाँ जो़डी’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या धम्माल विनोदी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडीया अकाउंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

परिणीतीने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत, पुन्हा एकदा सिध्दार्थसोबत झळकतेय असं लिहलं आहे. तर सिध्दार्थने लिहलंय, ही आहे अभय आणि बबलीची देशी आणि अनोखी जोडी. ‘जबरियाँ जो़डी’ या सिनेमाची विनोदी प्रेमकथा असल्याचे समजते.

https://twitter.com/ParineetiChopra/status/1031406821158862848

प्रशांत सिंद यांचे दिग्दर्शन लाभलेल्या ‘जबरियाँ जोडी’ या सिनेमाचे बालाजी टेलिफिल्म्स आणि कर्मा मिडिया एंटरटेन्मेन्ट सह- प्रस्तुतकर्ते आहेत. परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रायापूर्वी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हसी तो फंसी’ या सिनेमात एकत्र झळकले होते. आता या दोघांची ‘जबरियाँ जो़डी’ प्रेक्षकांना किती आवडते, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर समजेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive