‘बिग बॉसच्या घरातील हे तीन स्पर्धक म्हणत आहेत, ‘तुझी माझी जोडी जमली’

By  
on  

बिग बॉसच्या घरात जसे टास्क रंगतील तसे सद्स्यांमधील बाँड वाढताना दिसत आहे. अलीकडेच 'पोपटाचा पिंजरा' या नॉमिनेशन टास्कमुळे घरातील खेळ आता अधिकच रंजक झाला आहे. अनपेक्षित लोकांचे सूर जुळण्याबरोबरच नवे प्लॅन केले जात आहेत, नवी धोरणे आखली जात आहेत... स्पर्धक सगळं काही करत आहेत. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नव्या क्लीपमध्ये आपण पाहू शकू की एकमेकांवर विश्वास न ठेवता आपल्या स्वत:च्या खेळाचाच विचार करायचा, असे सगळेच स्पर्धक म्हणत आहेत. या सगळ्या गोंधळात नेहाने आपल्या पोपटाला कसे पिंजऱ्यात ठेवले हे मैथिली आश्चर्याने सांगते आणि शिवसोबत किशोरी, वीणा व रुपाली या तिघींची जोडी यावर कशी हसली. आपली बाजू स्पष्ट करताना शिव म्हणाला, "मी दुसऱ्या गोष्टीवर हसत होतो. तिने तुमचा पोपट टाकला पिंजऱ्यात त्याच्यावर नाही हसलो मी." या तिघींची गंमत करत गायिका वैशाली म्हणाली, "त्या तिघींचा इना, वीना आणि डिका चालू आहे." असे म्हणून ती किशोरी, वीणा आणि रुपाली या तिघींची थेट मस्करी करत 'इना-वीना-डिका' असे गाऊ लागली. असो. इना-वीना-डिकामधील घट्ट मैत्री आता घरात सगळ्यांना माहीत झाली आहे आणि ती तशीच टिकेल अशी आशा करूया.  

Recommended

Loading...
Share