........आणि प्रियंका निकमुळे आश्रमात फुलला आनंद

By  
on  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा साखरपुडा भारतीय पारंपारिक पध्दतीनुसार अखेर पार पडला आणि त्यांच्याबद्दलच्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.

निक आणि त्याच्या कुटुंबियांनी हा भारतीय पारंपारिक समारंभ खुप एन्जॉय केला. संपूर्ण जोनस कुटुंबियांनी भारतीय पेहराव करुन या साखरपुड्याच्या रोका विधीमध्ये सहभाग घेतला होता. देसी गर्लचे सासू-सासरे असल्याचे त्यांनी सिध्द करुन दाखवले. साखरपुडा आणि सेलिब्रेशनच्या पार्टीनंतर दोघांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या यापैकी,सेंट कॅथरिन अनाथ आश्रमालाही विशेष भेट दिली.

प्रियंका आणि निकसोबत निकचे कुटुंबियांनीसुध्दा या श्रमाला भेट दिली. यावेळी निकने अनाश्रमातील मुलींसमोर एक छानसं गाणं सादर केलं. हे गाणं ऐकून मुलींच्या चेह-यावर हसू  फुललं. टाळ्यांच्या कडकडाटात मुलींनी निकला दिलखुलास दाद दिली. अनेक कॉन्सर्ट गाजवणा-या निकचं आश्रमात गाणं सादर करणं, हे कुठल्याही मोठ्या इव्हेंटपेक्षा अमूल्य होतं. खुद्द प्रियंकानेसुद्दा निकचे या गाण्यासाठी आभार मानले.

https://www.instagram.com/p/Bmsy96ygnvK/?taken-by=priyankachopra

प्रियंकानेसुध्दा मुलींसमोर नृत्य सादर करत त्यांनासुध्दा आपल्या तालावर ताल धरायला लावला. संपूर्ण आश्रमाने प्रियंकाच्या या नृत्यावर जल्लोष व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/Bmtqrl1FwnR/?tagged=priyanka

आपल्या व्यस्त शेड्यूलमधलं प्रियंका आणि निकचं हे सोशल वर्क नक्कीच वाखणण्याजोगं आहे.

Recommended

Loading...
Share