By  
on  

आता पाहा, स्मिताचा 'लाजरान साजरा' मुखडा

आपल्या सहज-सुंदर अदांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्वत:चं एक स्थान निर्माण करणारी स्मिता गोंदकरवर सर्वच नेहमी तिच्या परफॉर्मन्समुळे तिचं कौतुक करतात. पहिल्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान स्मिताने पटकावला यावर ती खुपच समाधानीच नाही, तर तितकीचं खुश आहे.

‘पप्पी दे पारुला’ म्हणत सर्वांना वेड लावणारी स्मिता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर यशाचा आनंद जल्लोषात साजरा करुन पुन्हा बॅक टू वर्क म्हणत आपल्या विविध प्रोजेक्ट्सच्या शुटींगमध्ये व्यस्त झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bmupxa9ANvQ/?taken-by=smita.gondkar

‘पप्पी दे पारुला’च्या ब-याच कालावधीनंतर स्मिताचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्मितानेच तिच्या सोशल अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांना दिली. ‘लाजरान साजरा’ हे स्मिताचं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होत असून त्याचा फर्स्ट लूक शेअर करत स्मिता म्हणते, माझ्या या आगामी गाण्याबद्दल प्रचंड उत्सुक आहे.

व्हिडीओ पॅलेस आणि पायोनिर प्रोडक्शनने या ‘लाजरान साजरा’ गाण्याची निर्मिती केली असून शोभना गुडागे यांच्या सुमधूर आवजात हे गाणं स्वरबध्द करण्यात आले आहे.

‘पप्पी दे पारुला’सारखंच स्मिताचं ‘लाजरान साजरा’ हे गाणं रसिकांना किती आवडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive