प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत 'मिसेस मुख्यमंत्री'

By  
on  

नवनवीन विषयांच्या दर्जेदार मांडणीमुळे झी मराठी वाहिनी आज मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. झी मराठीवरील अनेक मालिका आज यशाच्या शिखरावर आहेत. 'तुला पाहते रे', 'तुझ्यात जीव रंगला', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'लांगिरं झालं जी' यांसारख्या असंख्य मालिकांना आज मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीनेसुद्धा दखल घेतली आहे.

लवकरच झी मराठीवर एक नवीन कार्यक्रम सुरु होणार असून 'मिसेस मुख्यमंत्री' असं या कार्यक्रमाचं नाव असणार आहे. आता ही एखादी मालिका असणार आहे कि एखादा रिऍलिटी शो हे मात्र चॅनलकडून अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नुकतंच झी मराठीने आपल्या इंस्टाग्रामवरून या आगामी कार्यक्रमाची एक झलक दाखवली आहे. 

 

 

सूत्रांच्या माहितीनुसार झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका लवकरच संपणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी 'मिसेस मुख्यमंत्री'ची वर्णी लागण्याची  शक्यता वर्तवण्यात आली  आहे. हा नवा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे हे येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांसमोर उलगडेल. 

Recommended

Loading...
Share