भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ व लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला आणि एक अटल व्यक्तिमत्त्व आपण गमावलं. आज सोशल मिडीयाचं जग आहे, त्यामुळे कुठलीही बातमी वा-यापेक्षा जास्त वेगाने पसरते आणि त्यावर चांगली-वाईट प्रतिक्रियासुध्दा त्याच वेगात येते. आजकाल ट्रोल करणं म्हणजे एखाद्याला धारेवर धरण्याचं असंच मोठं आणि प्रभावी माध्यम समजलं जातं.
बॉलिवूडचा टायगर म्हणजेच सलमान खान याने अटलजींच्या निधनावर आता, म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी शोक व्यक्त करत देशाने महान व्यक्तिमत्त्वाला गमावल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट भाईजानला चांगलेच महागात पडलेय. नेटक-यांनी त्याच्या या ट्विटवर त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. काहींनी म्हटलंय, ‘अटलजींची तुला फारच आठवण येतेय’, तर काही म्हणतायात, ‘टायगर इतने दिनसे सोया था क्या’, ‘तुमच्याकडे कुठले वर्तमानपत्र येते’, असे नानाविविध त-हेने सल्लूमियॉंची नेटकरी मजा घेत आहेत. पण सोशल मिडीयावर अशाप्रकारे ट्रोल झाल्याचा त्याला काही फरक पडत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वीसुध्दा अनेकदा त्याला त्याच्या सिनेमांमुळे ट्रोल करण्यात आले होते.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1031924081287786496
‘भारत’ सिनेमासाठी नुकताच सलमान माल्टा येथे शूटींगमध्ये व्यस्त होता. तरीसुध्दा त्याने आपल्या कुटुंबियांना यावेळी सोबत नेले होते व वेळात वेळ काढून त्याने आई सलमा खान यांच्यासोबत माल्टाची सफर केली. मायलेकाच्या या भटकंतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर बराच व्हायरल झाला होता.