परिणीती म्हणतेय, ‘पैसे दो.... जूते लो’ !

By  
on  

प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्या नाते साग्रसंगीत साखरपुडा आणि सेलिब्रेशन पार्टीमुळे अखेर अधिकृत झालेच. देसी गर्लचे कुटंबिय आणि जोनस परिवार सर्वच जण आता लग्नाच्या जोरदार तयारीला लागले आहेत. तर इथे प्रियंकाची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्रा आपले विदेशी जिजू निक जोनसचे शूज लपवण्यासाठी पूर्ण प्लॅन तयार करत आहे. ती म्हणते, “ हो माझा पूर्ण प्लॅन तयार आहे. माझी आणि जिजूची याबाबतच्या डीलवर चर्चा सुरू आहे आणि प्रियंकासुध्दा या प्लॅनसाठी आमची साक्षीदार आहे.”

 

निक-प्रियंका यांच्या रोकाविधीच्या वेळी परिणीती खुपच भावूक झाली होती. भावूक होत तिने एक पोस्टसुध्दा केली होती. “आज मी मॅजिक आणि फेरीटेल या दोन्ही गोष्टी खुप जवळून अनुभवल्या. मिमी दिदी आणि मी लहानपणी घर-घर खेळायचो आणि गृहिणी होऊन आमच्या काल्पनिक नव-याला चहा द्यायचो आणि कल्पना करायचो, एक दिवस आपल्याला मि. परफेक्ट सापडेल. आज ते तंतोतंत खरं होतं आहे. प्रियंका बाहेरून जरी स्ट्रॉंग दिसत असली तरी आतून ती खुप सॉफ्ट आहे आणि निकवर वेड्यासारखं प्रेम करते. तिच्यासाठी निकशिवाय दुसरा परफेक्ट व्यक्ती कोणी असूच शकत नाही.”

https://www.instagram.com/p/Bmn92EUlHlQ/?taken-by=parineetichopra

आता प्रियंका चोप्राच्या शानदार लग्नसोहळ्यात परिणीती आणि तिचे निक जिजू यांच्यात काय धम्माल नाट्य घडते हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रियंका आणि निकचा साखरपुडा भारतात पारंपारिक पध्दतीने पार पडल्यानंतर आता तो आपल्या मायदेशी परतला असून प्रियंका तिच्या सिनेमांच्या प्रोजेक्ट्समध्ये पुन्हा व्यस्त झाली आहे.

 

 

Recommended

Loading...
Share