By  
on  

‘आओ कभी हवेली पर...’क्रितीचा हटके अंदाज

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचा आगामी स्त्री हा हॉरर –कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं ‘आओ कभी हवेली पर...’ हे हटके गाणं नुकतंच लॉन्च झालं आहे. अभिनेत्री क्रिती सेनन या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. ‘आओ कभी हवेली पर...’ या गाण्याचे आणि स्त्री सिनेमाचे यापूर्वी बरेच मिम्ससुध्दा प्रसिध्द झाले होते.

https://youtu.be/PkgStlsVaqw

राजकुमारनेसुध्दा या गाण्याबद्दल ट्विट करत, “सांगितलं होतं ना तुम्हाला खुप मजा येईल” असं म्हटलं आहे. ‘आओ कभी हवेली पर...’ हे धम्माल गाणं बादशाह, निकिता गांधी आणि सचिन-जिगर यांनी गायलं असून बादशाह यांनी शब्दबध्द केलं आहे. प्रेक्षकांचीसुध्दा या गाण्याला पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे या सिनेमाचं दुसरं गाणं असून यापूर्वी ‘मिलेगी मिलेगी’ हे गाणं श्रध्दा आणि राजकुमारवर चित्रित करण्यात आलं.

https://twitter.com/RajkummarRao/status/1032141554289467393

‘स्त्री’ सिनेमात राजकुमार आणि श्रध्दा बरोबरच पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि विजय राज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अमर कौशिक यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा भयपट असल्याचे समजतेय. भोपाळ, मध्यप्रदेशच्या चंदेरी या एका छोट्याशा गावात शूटींग करण्यात आली आहे. दिनेश विजन आणि मडॉक फिल्मसने सिनेमाची निर्मिती केली आहे.

येत्या 31 ऑगस्टला ‘स्त्री’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive