By  
on  

भेटा ‘लव्ह सोनीया’ मधील अंजलीला

'लव्ह सोनिया' हा आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'स्लमडॉग मिलेनिअर' आणि 'लाइफ ऑफ पाय' यांसारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणारे तबरेज मुरानी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. यात अंजली ही भूमिका साकारतेय आपली मराठमोळी सई ताम्हणकर. आता आंतराराष्ट्रीय पातळीवरही ती आपल्या अभिनयाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्यासोबतच मार्क डप्लास, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चड्डा, रिया सिसोदिया, अनुपम खेर, आदिल हुसैन आणि सनी पवार या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मानवी तस्करी हा आजच्या जगातला महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा मुद्दा 'लव्ह सोनिया' या सिनेमाद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

तबरेज नुरानी यांचे 'तमाशा टॉकीज' आणि डेव्हिड वूमार्क यांचे 'वूमार्क प्रोडक्शन' यांची निर्मिती असलेल्या 'लव्ह सोनिया'च्या सहनिर्मातीची जबाबदारी शालिनी ठाकरे यांच्या सिनेमंत्र प्रोडक्शनने सांभाळली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive