आजकाल स्टार्सपेक्षा स्टारकिडचीच जास्त चर्चा होताना दिसते. या लहान सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट कॅमे-यात कैद होताना आपण पाहतो. त्यांच्या स्टार आई-बाबांपेक्षा ही मुलंच जास्त कॅमे-यासमोर झळकताना दिसतात. बॉलिवूडची ग्लॅमरस मॉम करिना कपूर आणि प्रसिध्द दिग्दर्शक-निर्मता करण जोहर यांच्यातील मैत्री जगजाहीर आहेच. परंतु त्यांच्यासारखीच त्यांच्या मुलांमध्येसुध्दा छान मैत्री आहे. खेळण्यानिमित्त किंवा फिरण्यासाठी करिनाचा लाडला तैमूर आणि करणची जुळी मुलं यश व रुही यांना नेहमी एकत्र स्पॉट केलं जातं. या सर्व स्टार किड्सचे विविध गोड फोटो आपल्याला सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
https://www.instagram.com/p/BlPxHGKnk_X/?taken-by=therealkareenakapoor
दिग्दर्शन-निर्मिती व टॉक शोच्या सूत्रसंचलनानंतर करण जोहर आता रेडिओ जॉकीसुध्दा बनला आहे. त्याचा कॉलिंग करण हा 104.8 इश्क एफ.एम.वर ऑन एअर होतो. या शोचा पहिला सीझन हिट झाल्यानंतर आता दुसरा सीझन आला आहे. या शो दरम्यान करणने मुलगी रुही आणि करिनाचा लाडला तैमूरबद्दल असं काही वक्तव्य केलंय, ज्यामुळे करण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
https://www.instagram.com/p/BitJb8Hg1cW/?taken-by=karanjohar
एका कॉलरने करणला प्रश्न विचारला, “आपल्या देशात मुलगा आणि मुलगी जर एकत्र दिसले तर त्यांच्याबद्दल बोलायला सुरूवात होते किंवा त्या मुलाला आणि मुलीला एकमेकांना बहिण-भाऊ म्हणायला सांगतात. तसंच जर एखादी वडिलधारी व्यक्तीसोबत असेल तर त्यांना काकी किंवा काका म्हणायला सांगितलं जातं, ही आपल्या देशाची मोठी समस्या मला वाटते.”
https://www.facebook.com/IshqFM/videos/294552448019666/
या प्रश्नावर उत्तर देताना करण म्हणतो, “मला दोन मुलं आहेत. यश आणि रुही. कधीकधी त्यांच्यासोबत खेळायला इतर मुलंही येतात. त्यावेळेस त्या मुलाला भैय्या म्हण असं रुहीची केअर टेकर तिला सांगते. हीच बाब तैमूरच्या बाबतीतसुध्दा घडते. त्यालाही रूहीला भैया म्हणायला सांगितलं जातं. पण मला हे पटत नाही. आपण त्यांच्यावर आत्तापासूनच नाती कशाला लादायची. कदाचित 20 वर्षानंतर दोघेही एकत्र फिरू शकतात किंवा राहूसुध्दा शकतात. त्याचं त्यांना ठरवू दे. आपण त्यांना का सांगायचं?