मराठी सिनेसृष्टीतील सुंदर व गुणी अभिनेत्री अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारी सौंदर्यवती म्हणजे, श्रृती मराठे. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून ती प्रेक्षकांवर नेहमीच भुरळ पाडते. सोशल मिडीया अकाऊंटवर नुकताच श्रृतीने स्वत:चा एक अप्रतिम लूक शेअर केला आहे. पांढ-या रंगाच्या कॉटन साडीमध्ये श्रृती खुपच खुलून दिसतेय. थोडाफार रेट्रोकडे झुकणारा तिचा हा जबरदस्त अंदाज नक्कीच पाहणा-यांना घायाळ करणारा आहे.
https://www.instagram.com/p/Bmz3shdAJmw/?taken-by=shrumarathe
हा सुंदर फोटो शेअर करत, श्रृती म्हणते, “काहीतरी वेगळा प्रयत्न यावेळेस केला आहे. कदाचित तुम्हा सर्वांना तो नक्की आवडेल अशी आशा हे..” लवकरच श्रृती आगामी ‘शुभमंगल सावधान’ सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमानिमित्ताने अभिनेता सुबोध भावे आणि ती पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यापूर्वी ही मेड फॉर इच अदर अशी वाटणारी जोडी ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमात एकत्र झळकली होती.
श्रृतीच्या ‘शुभमंगल सावधान’ सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.