'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात

By  
on  

हृतिक रोशनचा आगामी 'सुपर 30' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. ट्रेलर पासूनच या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. हृतिकची आजवरची वेगळी भूमिका म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.

हृतिकच्या वेगळ्या भूमिकेसोबत या सिनेमातली गाणी सुद्धा चर्चेत आहेत. नुकतीच या सिनेमातली 'जुग्राफिया' आणि 'पैसा' ही दोन गाणी  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. या गाण्यांना सुद्धा प्रेक्षक पसंती मिळत आहे. या दोन्ही गाण्यांच्या आणि 'सुपर 30' या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल या मराठमोळ्या संगीतकारांकडे आहे. 

 

अजय-अतुल यांनी 'जुग्राफिया' या सिनेमात प्रेममयी हळुवार संगीत दिलं आहे. तर 'पैसा' या गाण्याच्या संगीतामध्ये खास पाय थिरकायला लावणारं हटके संगीत ऐकायला मिळतं. यावरूनच या सिनेमातून अजय-अतुल या 'सैराट' संगीतकारांच्या जोडीच्या संगीताची जादू अनुभवायला मिळत आहे. 

 

'सुपर 30' मध्ये हृतिक आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमात हृतिकसोबत मृणाल ठाकूर, पंकज त्रिपाठी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा १२ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share