By  
on  

अभिनेते विजय चव्हाण अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार पार पडले. सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली.अलका कुबल, प्रदीप कबरे, अंकुश चौधरी, सुशांत शेलार आदी कलाकार उपस्थित होते.

मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘मोरूची मावशी’ या नाटकात त्यांनी सशक्त स्त्री पात्र रंगवल्याने ते खुप प्रसिध्द झाले होते. ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे त्यांचं नाटकसुध्दा प्रचंड गाजलं विजय चव्हाण यांनी आतापर्यंत जवळपास 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे

Author

Recommended

PeepingMoon Exclusive