By  
on  

7 वर्षांनी प्रिया उमेश आले एकत्र, 'आणि काय हवं...?' ह्या लव्हेबल वेबसिरीजचा ट्रेलर एकदा पाहाच

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. प्रिया आणि उमेश एका वेबसिरीजमधून समोर येणार आहेत. 'एम एक्स' प्लेअरच्या ‘आणि काय हवं?’ या  वेबसिरीजमधून ही रिअल लाईफ  जोडी समोर येत आहे.

नुकतंच त्यांच्या 'आणि काय हवं...?' या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लग्न झालेल्या एका जोडप्याच्या वेडेपणाची गोष्ट या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. उमेश आणि प्रियाची लव्हेबल केमिस्ट्री या सिरीजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात शंका नाही. 

 

 उमेश आणि प्रिया वेगवेगळ्या सिनेमातून रसिकांना भेटत राहिले पण एकत्र काम करण्याचा योग येत नव्हता. या वेबसिरीजमधून हा योग जुळून आला आहे. प्रियाने अलीकडेच 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका केली. तसेच उमेश मुख्य भूमिकेत असलेलं नाटक ‘दादा एक गुड न्युज आहे !’ देखील प्रोड्युस केलं होतं. उमेश या वेबसिरीजमध्ये साकेत या तरुणाची व्यक्तिरेखा साकारत आहे तर प्रिया जुईच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांमधील लग्नानंतरचं आंबटगोड प्रेम या सिरीजमध्ये दिसेल.

'मुरांबा' या सिनेमाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी या वेबसिरीजचं लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 16 जुलै पासून ही सिरीज 'एम एक्स' प्लेयर या डिजिटल माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive