By  
on  

अनुष्का शर्मा नाही,सोशल मिडीयावर सुरु आहे सनी लिओनीची चर्चा

बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओनी फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टनुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे एकूणच सोशल मिडीयावर सनीचाच बोलबाला असल्याचं यावरुन सिध्द होत आहे.

बाकी बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत सनी 100 गुणांसह सर्वाधिक चर्चा करण्यात आलेली फेसबुक सेलिब्रिटी असल्याचं आढळून येत आहे. ‘सुई धागा’ फेम अनुष्का शर्मा 90 गुणांसह ‘मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी’च्या या यादीत दुस-या स्थानावर आहे. तर माधुरी दिक्षीत 86 गुणांसह तिस-या, प्रियंका चोप्रा 84 गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस 83 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, "गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या करनजीत कौर या वेबसीरिजीमुळे सनीची लोकप्रियता खूप वाढली होती. त्यातच तिचा रणविजयसोबत स्प्लिस्टविला सिझन 11 हा शो लाँच झाला आणि मग तिची डिजीटल माध्यमांमध्ये लोकप्रियता खुप वाढली. यामुळेच मग ती फेसबुकवर सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयी पोस्ट आणि रिपोस्ट झाले.”

अश्वनी कौल पुढे सांगतात, " 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो"

Author

Recommended

PeepingMoon Exclusive