By  
on  

पाहा, सुबोध-श्रृतीचं शुभलग्न सावधान

अभिनेता सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेला व लग्नाची अनोखी व्याख्या मांडणारा शुभलग्न सावधान हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आलं. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या कलाकारांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते.

पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध आणि श्रृतीसोबतच डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाच्या सनईचौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे.‘शुभलग्न सावधान’ सिनेमातल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय? हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली नसेल तर नवलच !

फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित शुभलग्न सावधान हा सिनेमा येत्या 12 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive