By  
on  

हीच आहे, संजय जाधवची ‘लकी’ गर्ल

सध्या संजय जाधव यांच्या आगामी ‘लकी’ सिनेमात आपली वर्णी लावण्यासाठी मराठी सेलिब्रिटींमध्ये प्रचंड चढाओढ सुरू आहे. अभिनेता उमेश कामत आणि सिध्दार्थ जाधवनंतर आता सईने आपण संजय दादाची ‘लकी’ गर्ल असल्याचा खुलासा नुकताच केला आहे.

सई फारच इंटरेस्टिंग पध्दतीने म्हणते, “पावभाजीतून भाजी, संक्रांतीतून पतंग आणि श्रावणातून मंगळागौर जर काढलं तर काय अर्थ राहील या सर्वांना, अजिबातचं नाही....ना. तसंच आहे, हेसुध्दा जर संजय दादाच्या सिनेमातून मला काढलं तर काय, म्हणूनच सांगेत मीच आहे दादाची ‘लकी’ गर्ल”.

https://twitter.com/SaieTamhankar/status/1034798068703678464

मराठीसोबतच हिंदीतसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकर सध्या आपला आगामी हिंदी सिनेमा ‘लव सोनिया’च्या प्रोमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. यात ती अंजली या देहविक्री करणा-या दलालाच्या अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रत्येक भूमिकेसोबत समरसून जाऊन सिनेमाला योग्य न्याय देणा-या सई ताम्हणकरने ‘लव सोनिया’साठी जवळ-जवळ 10 किलो वजन वाढवलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे सई ताम्हणकराचा अफलातून ग्लॅमरस अंदाज नुकताच लॅक्मे फॅशन विकमध्ये दिसून आला. यात तिला एक नाही दोन नाही तर तीन-तीन डिझाइनर्सकडून निमंत्रण होतं.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive