By  
on  

.........म्हणून काजोलने दिला होता शाहरुखची बहिण होण्यास नकार

काजोल आणि शाहरुख खानची मैत्री जगजाहीर आहे. दोघांनीसुध्दा बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ऑन-स्क्रीन जितकी छान त्यांची केमिस्ट्री जुळते तशीच ऑफ-स्क्रीनसुध्दा मस्त गट्टी जमते. आजही दोघं नायक-नायिकेच्या जोडीत नेहमीच परफेक्ट बसतात. महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी काजोलने शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला होता, हे नुकतंच स्पष्ट झालं आहे.

काजोलला जेव्हा शाहरुखच्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आलं तेव्हा तिने चक्क नकार दिला. 2000 साली प्रदर्शित झालेल्या जोश या सिनेमासाठी तिला त्याच्या बहिणीच्या भूमिकेसाठी ऑफर होती, पण शाहरुखसोबतचे तिचे सिनेमे आणि केमिस्ट्री व दोघांची एकत्रित इमेज पाहता तिने या भूमिकेला नकार दिला. मग नंतर ही भूमिका ऐश्वर्याने साकारली होती.

शाहरुख-काजोल जोडीने बाजीगर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, दिलवाले यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. प्रेक्षकांचीसुध्दा ही आवडती जोडी आहे.

आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल हिची प्रमुख भूमिका असलेला ‘हेलिकॉप्टर ईला’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती एका विभक्त झालेल्या आईच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला ट्रेलरवरुन समजते. मुलासाठी अविरत झटणा-या एका आईची ही कहाणी आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive