By  
on  

इरफान खान लवकरच करतोय दमदार पुनरागमन

बॉलिवूडमदील एक हरहुन्नरी कलाकार अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता इरफान खान आजारपणातून लवकरच बरा होऊन दमदार पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. सर्वचजण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट आतुरतेने पाहात आहे. तुम्हा सर्वांना हे वाचून आनंद होईल, सुजित सरकार दिग्दर्शित उधम सिंह या बायोपिकद्वारे इरफान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एखाद्या भूमिकेत समरसून जाऊन ती साकारणं हे इरफानचं खास वैशिष्ट्य, हे आपण जाणतोच.

संपूर्ण सिनेविश्व आता इरफानच्या बरे होण्याची वाट पाहात आहे. परदेशातून उपचार घेऊन आल्यावर सुजित सरकारच्या सिनेमाचं शुटींग तो सुरू करणार असल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. तसंच उधम सिंह या बायोपिकमधील ही प्रमुख व्यक्तिरेखा हुबेहुब इरफानशिवाय इतर कोणीचं साकारू शकत नसल्याचं शूजित सरकार यांचं म्हणणं आहे. उधम सिंह हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीकारी होते. त्यांचाच हा जीवनपट आहे.

सहज-सुंदर अभिनय करत भूमिका साकारणा-या इरफानचा उधम सिंह हा उपचारानंतर परतल्यावरचा पहिला सिनेमा ठरेल. इरफानच्या सिनेमांची चाहते आता आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive