By  
on  

पाहा, हृदयात समथिंग समथिंगचा रिफ्रेश करणारा टिझर

मुलींच्या मागे धावणारा धम्माल नायक आणि त्याला तशीच हटके साथ देणारा त्याचा लव्हगुरू अशी काहीतरी धमाकेदार  हृदयात समथिंग समथिंग या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या रिफ्रेशिंग टिझरला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेते अशोक सराफ पुढे स्पष्ट करतात, “आयुष्यात कधीही प्रेमात न पडलेला माणूसच विरळा. त्यामूळे प्रत्येकाला प्रेमात पडल्यानंतर ह्या सिनेमात होणा-या गंमती-जंमती कधीतरी आपल्याही बाबतीत घडल्यात असे वाटेल. ही तुमच्या-आमच्या सर्वांच्या ‘हृदया’जवळची कथा आहे.”

https://www.youtube.com/watch?v=ECgNTRPWydg&feature=youtu.be

अभिनेता अनिकेत विश्वासराव सांगतो, “अशोकमामांनी आपल्या सर्वांच्या हृदयात गेली कित्येक वर्ष राज्य केले आहे. आणि आता ह्या मॅड-कॉमेडी सिनेमातून पून्हा एकदा त्यांचं धमाल कॉमिक टाइमिंग आपल्याला अनुभवता येईल. हा कौटूंबिक मनोरंजक सिनेमा तुम्हांला पोटभर हसवेल, असा मला विश्वास वाटतो.”

सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी म्हणतात, “प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीला इम्प्रेस करताना प्रेमवीरांचा कधी-कधी गोंधळ उडतो. ह्या त्रेधातिरपिटीमधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा सिनेमा येत्या 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive