By  
on  

पुन्हा कोकणाक चला, सुरू होतेय 'गाव गाता गजाली’

कोकणातल्या अस्सल मातीतल्या धम्माल गमती-जमती दाखवून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी ‘गाव गाता गजाली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.थोडक्यातच गोडी या उक्तीप्रमाणे काही भागानंतर या मालिकेने विश्रांती घेतली होती. परंतु आता या मालिकेची टीम पुन्हा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. खास लोकाग्राहास्तव ‘गाव गाता गजाली’ ही मालिका येत्या 13 सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता पुन्हा सुरू होणार आहे.

https://twitter.com/i/status/1036261877125394432

‘गाव गाता गजाली’ मालिकेचे नवीन प्रोमोजसुध्दा झी मराठीवर पाहायला मिळत आहेत. या नवीन भागांचे शुटींगसुध्दा कोकणातच पार पडणार असून कलाकारांची पूर्वीचीच टीम यात भूमिका साकारणार असली तरी कोकणातील काही नवीन कलाकारांनासुध्दा यात संधी देण्यात येणार असल्याचे टीव्ही सूत्रांनी सांगितले आहे.

‘गाव गाता गजाली’ मालिकेचे लेखन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत पांडूची भूमिका साकारणारा प्रल्हाद कुडतरकरवर आहे. कोकणी भाषा,तेथील परंपरा,पदार्थ, तेथील खासियत, राहणीमान या सर्वंच गोष्टींचे रंजक दर्शन घडवणा-या ‘गाव गाता गजाली’ कार्यक्रमाची आता प्रचंड उत्सुकता लागून आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive