प्रबोधनकार नाट्यगृहाचं स्तुत्य पाऊल, नाटकादरम्यान मोबाईलचा त्रास टाळण्यासाठी केलं आवाहन

By  
on  

नुकतंच सुबोध भावेने 'अश्रूंची झाली फुले' नाटकाच्या वेळी प्रेक्षकांच्या मोबाईल फोनचा त्रास झाल्याने फेसबुक वर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. वारंवार विनंती करुनही काही अतिउत्साही प्रेक्षकांमुळे इतर प्रेक्षकांचा रसभंग होतो. त्यामुळे प्रबोधनकार नाट्यगृहाने प्रयोगदारमण कलाकारांना होणार त्रास कमी करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. 

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाने प्रवेशद्वाराजवळ एक पाटी लावली आहे. 'विनाअडथळा प्रयोग संपन्न व्हावा म्हणून प्रेक्षकांनी आपले मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करावेत', असं आवाहन प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाने प्रेक्षकांना केले आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरांकडून कौतुक होत आहे. 

सुबोध भावेने सुद्धा ट्विटरवर पोस्ट लिहून प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे आभार मानले. 'नाटक फक्त आमचं नाहीय तर ते प्रेक्षक म्हणून तुमचंही तितकंच आहे.' अशी एक पोस्ट लिहून सुबोधने प्रेक्षकांना सूचना केली. 'कृपया, आनंद मिळवण्याच्या मध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये.' असंही सुबोध म्हणाला. 

 

'प्रयोगादरम्यान फोन वाजल्यास यापुढे नाटकात काम करणार नाही', अशी टोकाची भूमिकाही सुबोधने घेतली होती. नंतर सुबोध म्हणाला,'पण रंगभूमीने कलाकाराला इतक्या लवकर हार मानण्यास शिकवले नाही. त्यामुळे आता प्रयोग सुरू होण्यापूर्वी सहकलाकारांसोबत मिळून स्वत: डोअरकीपरचे काम करणार' सुबोधला नाट्यक्षेत्रातील सर्व कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी पाठिंबा दर्शवला. असाच अनुभव काही दिवसांपूर्वी सुमित राघवनला सुद्धा आलेला. 

आता या निर्णयामुळे आता तरी प्रेक्षकांना जाग येणार का? आणि विनाअडथळा प्रयोग संपन्न होणार का? याची कलाकारांना आणि नाट्यव्यवस्थापकांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share