‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या सिनेमातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. 'बाबा' मध्ये अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच बालकलाकार आर्यन मेंघजी या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.
गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अशा भूमिकांसाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो. बालकलाकार आर्यन मेघांज त्याला अपवाद‘बाबा’ नाही. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना आर्यननेही स्वतःची प्रतिभा सिद्ध केली आहे. तो म्हणतो की या सिनेमाबद्दल त्याला खूप उत्कंठा लागून राहिली आहे. या सिनेमाच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणतो, 'बाबा' मध्ये काम करताना मला खुप मज्जा आली. मी यामध्ये शंकर नावाचं पात्र साकारलं आहे. मी या सिनेमामध्ये दीपक सर, नंदिता पाटकर, अभिजीत सर, जयवंत वाडकर यांच्याबरोबर काम केले आहे आणि राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. सिनेमातील माझी भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती साकारताना मला खूप मजा आली’.
आर्यन पुढे म्हणाला की “या सिनेमासाठी काम सुरु करण्याआधी मी ‘१५ ऑगस्ट’ केला. तो सिनेमा डिजिटली प्रदर्शित झाला होता. मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष प्रदर्शित होणारा ‘बाबा’ हा माझा पहिला सिनेमा असून त्याचमुळे या मला खूप उत्सुकता आहे.”
अवघ्या नऊ वर्षांच्या आर्यनने 'गणपती बाप्पा मोरया', 'कुलस्वामिनी' या मराठी आणि अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सध्या गाजत असलेल्या मराठी ऐतिहासिक मराठी मालिकेमध्ये त्याने छोट्या राजाराम राजेंची भूमिका केली आहे. ‘१५ ऑगस्ट’ सिनेमातील त्याची भुमिका खूप गाजली.
‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. 'बाबा'च्या माध्यमातून दीपक मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेघनजी यांची साथ आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.