पाहा,सुबोध-श्रृतीच्या रोमॅण्टिक अंदाजातलं गाणं ‘हे वेड आहेस तू.....’

By  
on  

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे यांचा लग्नसंस्थेवर आधारित ‘शुभलग्न सावधान’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमानिमित्ताने दोघांच्याही रोमॅण्टीक अंदाजातील एक छान गाणं ‘हे वेड आहेस तू.....’ नुकतंच उलगडलं. या गाण्यात सुबोध-श्रृती मेड फॉर इच अदर असेच वाटतायत.

 

सुबोध-श्रृतीच्या लव्ह केमिस्ट्रीला आणखी चार चांद लावणारं हे गाणं परदेशात चित्रीत करण्यात आलं असून तेथील विविध नयनरम्य लोकेशन्स पाहायला मिळतायत. दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल आपल्याला दिसून येत असून, तेथील गगनचुंबी इमारती पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. त्यामुळे तरुणाईलासुध्दा हे गाणं प्रचंड आवडणार यात शंका नाही. मंदार चोळकर यांनी हे गीत शब्दबध्द केलं असून तरुणाईचे लाडके चिनार-महेश यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अपेक्षा दांडेकर आणि हर्षवर्धन वावरे यांच्या सुरेल आवाजात ते स्वरबध्द कऱण्यात आलं आहे.

 

https://youtu.be/dJ9byqryQv8

पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध आणि श्रृतीसोबतच डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत,विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित शुभलग्न सावधान हा सिनेमा येत्या 12 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सर्वांनाच सुबोध-श्रृतीच्या या ‘शुभलग्न सावधान’ सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share