By  
on  

'दादा एक गुड न्यूज आहे' सोबत करा रक्षाबंधनचं खास सेलिब्रेशन

बहीण - भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे केले. भावा-बहिणीचे नाते हे नेहमीच खास असते. या नात्यात कधी भांडणे असतात तर कधी थट्टामस्करी असते, कधी रुसवे, फुगवे असतात तर कधी अबोलाही असतो आणि या सगळ्यामागे असते ते फक्त निःस्वार्थी प्रेम. भावा-बहिणेचे हे अतूट नाते अधिक समृद्ध करण्यासाठी आणि  'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्ताने रक्षाबंधनच्या दिवशी एका अनोख्या सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी रक्षाबंधनला म्हणजेच १५ ऑगस्टला ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे दुपारी ४. ३० वाजता 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक बघायला जाताना, आपला भावा-बहिणीसोबतचा एखादा सुंदर फोटो सोबत घेऊन जा, त्याच्यामागे तुमची एखादी एकमेकांसोबतची खास आठवण लिहा आणि प्रयोगाआधी तो ड्रॉपबॉक्समध्ये टाका. प्रयोगाच्या शेवटी ३ विजेत्या भाव-बहिणींना सोन्याची राखी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे 'दादा एक गुड न्यूज आहे'च्या पुढाकाराने आयोजिलेल्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होऊन, यंदाचे तुमचे रक्षाबंधन अधिकच खास आणि अविस्मरणीय होईल यात शंका नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

१०० वा प्रयोग आणि राखी पौर्णिमेनिमित्त स्पर्धा! नियम: 1) तुमचा तुमच्या बहीण/भावाबरोबरचा एखादा फोटो निवडा. हार्ड कॉपी फोटो, डिजिटल नाही! 2) त्या फोटोच्या मागे तुमची एखादी स्पेशल आठवण आणि तुमची नावं लिहा. 3) १५ ऑगस्टला प्रयोगाला या. येताना तो फोटो आणि त्यामागे आठवण लिहून घेऊन या. 4) तुम्ही प्रयोगाची तिकिटं BookMyShow वर किंवा नाट्यगृहावर - कुठेही काढू शकता. 5) प्रयोग सुरू होण्या आधी बाहेर ठेवलेल्या ड्रॉप बॉक्स मध्ये तुमचा फोटो सबमिट करा. 6) प्रयोगानंतर सर्वोत्कृष्ट फोटो आणि आठवणीच्या 3 बहीण-भावाच्या जोड्यांना पू. ना. गाडगीळ आणि सन्स @pngadgilandsons ह्यांच्या वतीने सोन्याची राखी भेट देण्यात येईल. राखी पौर्णिमेच्या दिवशी हा 'sibling day' celebrate करूया! चला पटापट, तिकिटं काढा आणि जुन्या अल्बम मध्ये फोटो शोधायला सुरुवात करा! #DadaEkGoodNewsAhe #Show100 #ContestAlert #rakhispecial #thanekar

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

प्रिया बापट प्रस्तुत, अद्वैत दादरकर दिग्दर्शित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली, इतकेच नाही तर सिंगापूरवासियांनाही या नाटकाने आपलेसे केले. भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचे लेखन कल्याणी पाठारे यांनी केले असून उमेश कामत, हृता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सांगायला अतिशय आनंद होतोय की १००वा प्रयोग होणार आहे येत्या १५ ऑगस्टला! योगायोगाने त्याच दिवशी राखी पौर्णिमाही आहे. भावा बहिणीची ही स्पेशल गोष्ट सेलिब्रेट करायला ह्या पेक्षा चांगली संधी कोणती? पु. ना. गाडगीळ आणि सन्स सोबत आम्ही घेऊन येतोय एक contest. स्पर्धेचे स्वरूप काय, त्यात कसा भाग घ्यायचा हे सगळं सांगणार आहोत उद्या. कोणकोण सहभागी होणारे, सांगा आम्हाला कॉमेंट्स मध्ये! See you tomorrow! #DadaEkGoodNewsAhe #Show100 #ContestAlert #RakhiSpecial

A post shared by dadaekgoodnewsahe (@dadaekgoodnewsahe) on

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive