लवकरच येतोय अमिताभ बच्चन स्टारर ‘भूतनाथ 3’

By  
on  

‘भूतनाथ’आणि ‘भूतनाथ-2’सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर या सिनेमाचा तिसरा भाग ‘भूतनाथ3’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूतनाथची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. या सिनेमाच्या तिस-या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे


2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘भूतनाथ’सिनेमात एका लहान मुलाची भाबडी कथा पाहायला मिळाली तर दुस-या भागाला राजकीय अॅगल देण्यात आला होता, ज्यात मतदानाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिस-या भागातसुध्दा एका सामाजिक विषयावर भाष्य करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तिस-या भागात शाहरुखसुध्दा बिग बींसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘भूतनाथ’च्या या तिस-या भागाच्या निर्मितीसाठी टी-सिरीजचे भूषण कुमार आणि बी.आर स्टुडिओजने हातमिळवणी केली आहे.


याच सिनेमासंदर्भात बोलताना भूषण कुमार म्हणाले,“काही वर्षांपूर्वी भूतनाथ रिटर्नच्यावेळीसुध्दा आम्ही बी.आर स्टुडिओजसोबत काम केलं होतं. तेव्हापासूनच आमचे संबंध खुप छान जुळून आले. अमितजींसोबत काम करण्यात तर फारच मजा आली. आगामी सिनेमात बी आर स्टुडिओजसोबतच्या क्रिएटिव्ह पार्टनरशिपला आम्हाला आणखी पुढे घेऊन जायचं आहे.”
प्रेक्षकांनासुध्दा ‘भूतनाथ 3’च्या प्रदर्शनाची आणि त्यातील इतर कलाकारांची प्रचंड उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share