बिग बॉस 12 चा डंका वाजला असून या धमाकेदार कार्यक्रमाचं ग्रॅंड लॉंच सलमान खानसोबत गोव्यामध्ये नुकतंच पार पडलं. यावेळी मात्र भाईजान आणि प्रसिध्दी माध्यमं याच्यांत दिलखुलास गप्पा रंगल्या. मग काय, सलमान खानसोबत यावेळी खमंग चर्चा तर होणारच! पत्रकारांनीसुध्दा मौके पे चौका मारत त्याच्यावर यथेच्छ प्रश्नांचा सपाटा लावला आणि सल्लू मियॉंला उत्तरं देणं भाग पडलं.
अभिनेत्री प्रियंका चोप्राने सलमान खान स्टारर ‘भारत’ सोडल्यालंतर सलमानचं तिच्यासोबत चांगलंच बिनसलं होतं, हेच हेरुन त्याला प्रियंकावर तू अजूनही नाराज आहेस का, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा पठ्ठ्याने यावर जबरदस्त उत्तर देत सर्वांनाच चक्रावून सोडलंय. तुम्हालासुध्दा हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असेलच.
सलमान म्हणाला, “प्रियंकाने सिनेमा सोडला म्हणून मी तिच्यावर नाराज नक्कीच असलो तरी आता खुशसुध्दा आहे. तिचा साखरपुडा झाल्याचा मला प्रचंड आनंद आहे. तिचं लवकरच लग्न व्हावं अशी इच्छा असून तिनं मुलांचासुध्दा लवकरच निर्णय घ्यावा.”
तुम्हाला माहितच आहे, प्रियंकाने सलमान खान स्टारर ‘भारत’ सोडल्याने दबंग खान तिच्यावर भलताच रागावला होता. प्रियंकाने इतर सिनेमांसाठी ‘भारत’ सिनेमाला सोडचिठ्ठी दिल्याचं खरं कारण नंतर उघड झालं होतं. आता प्रियंकाच्या जागी कतरिना कैफची ‘भारत’मध्ये वर्णी लागली असून ती सलमानच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.