याड लागलं, याड लागलं गं....विक्रांत सरंजामेंच्या प्रेमात पडलीय ईशा

By  
on  

सरंजामेंच्या ऑफीसमधून ईशाला काढून टाकण्यात आल्यानंतर तिला स्वत:ला सावरणं फार कठीण जातं. कशातच लक्ष लागत नाही. दिवसभर बाहेर ती वणवण करत फिरतेय. नोकरी गेलीय हे घरी कसं सांगायचं हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आता उभा राहून ठाकला आहे. दुकानात वडिलांना तिच्या नोकरी करण्याचं कौतुक करताना पाहून ईशाला अश्रू अनावर होतात.
ईशा आता घरी निघाली असली तरी तिची पावलं घरी वळतच नाहीत. विक्रांत सरांसोबत घालवलेला तो एक सुंदर दिवस तिच्या डोळ्यासमोर सारखा तरळतोय. पाणीपुरी खाणं,चहा पिणं, बसमधून एकत्र प्रवास करणं यासर्वांमुळे मनात विचारांचं एक अनामिक काहूर माजलं आहे. काही सुचेनासं न झाल्याने ती बाप्पाच्या मंदिरात प्रार्थनेसाठी जाते.

https://www.instagram.com/p/BnVeX5NnPIh/?taken-by=zeemarathiofficial

इथे विक्रांत सरंजामेसुध्दा ईशा ऑफिसमध्ये नसल्याने अस्वस्थ झाले आहेत. ते तिला शोधत आपसूकच मंदिरात येतात. ईशा आणि सरंजामेंची भेट घडते, व दोघांच्याही काळजाचा ठोका चुकतो. ते ईशाला उद्यापासून ऑफिसमध्ये येण्यास सांगतात आणि आय ट्रस्ट यू म्हणतात. इथेच ईशा त्यांच्या नकळत प्रेमात कधी पडते हे तिचं तिलाच कळत नाही. पण तिच्या मनाने कौल दिला आहे. सरंजामेंशिवाय तिला दुसरं कोणाचा विचारच करायचा नाही.बाबांची इच्छा तिला कळेलच नंतर; पण त्याआधीच ईशाच्या मनाने धुडकावलंय वयातलं अंतर....!!

विक्रांत सरंजामेसुध्दा ईशाच्या प्रेमात पडले आहेत का? ती विक्रांत सरांच्या प्रेमात पडलीय ही कबुली ती त्यांना कधी व कशी देणार? आई-बाबांना कसं सांगणार ? कुठले अडथळे तर नाही येणार ना तिच्या प्रेमात ? या सर्वांची उत्तरं तुम्हाला ‘तुला पाहते रे’ मालिकेत मिळतील. तेव्हा पाहत राहा, झी मराठीवर ‘तुला पाहते रे’ सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वा.

Recommended

Loading...
Share