ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

By  
on  

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे समजते. दिलीप कुमार यांच्या ट्विटर पेजवरुन त्यांना छातीच्या संसर्गाच्या त्रासामुळे अस्वस्थ वाटत होते, म्हणूनच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसंच तुमच्या दुवा आणि प्रार्थनेची गरज असल्याचेसुध्दा नमूद केले

https://twitter.com/TheDilipKumar/status/1037289605215739904

डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या एका वक्तव्यानुसार सायरा बानू म्हणाल्या,"नियमित तपासणीसाठी त्यांना लिलावतीत दाखल करण्यात आले आहे. त्यांना काही दिवस इथे ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या काही तपासण्या करणार आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम येथे सज्ज आहे.

Recommended

Loading...
Share