अभिनेता स्वप्निल जोशीच्या मुलाची ही जाहिरात पाहिलीत का?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी म्हणजे सुपरहिट सिनेमा हे समीकरण आपल्या सर्वांनाच माहितीय. पण आज आपण स्वप्निलबद्दल किंवा त्याच्या सिनेमांबद्दल अजिबातच जाणून घेणार नाही आहोत. स्वप्निलचा मुलगा राघवबद्दल आम्ही तुम्हाला काही खास सांगणार आहोत, ते ऐकून तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.... कारण जसा बाप तसा बेटा!

[video width="640" height="360" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/09/swwapnil_joshi_40762052_276640226280284_4996233398423912448_n.mp4"][/video]

स्वप्निलच्या म्हणजेच वडिलांच्याच पाउलावर पाउल ठेवत त्याचा मुलगा राघव हा जाहिराज क्षेत्रात पदार्पण करतोय....तुम्ही म्हणाल तो तर फार लहान आहे...जवळपास एक वर्षांचा असेल...हे कसं शक्य आहे. होय..पण ही बातमी खरी आहे. गोंडस राघव जॉन्सन अण्ड जॉन्सन्सच्या जाहिरातीत झळकतोय. या जाहिरातीत त्याच्यासोबत त्याचे आई-बाबा म्हणजेच स्वप्निल आणि त्याची पत्नी दोघंही उत्पादनाबद्दल माहिती देताना पाहायला मिळतायत.

https://www.instagram.com/p/BnV-E5cjhPS/?taken-by=swwapnil_joshi

या उत्पादनाबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, “मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन" च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टॉप टू टो वॉश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे 5.5 लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस्ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी याचीच निवड केली.”

Recommended

Loading...
Share