‘सुई-धागा’ची जोडी अनुष्का-वरुण बाप्पासाठी बनवणार मोदक

By  
on  

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन या जोडीचा ‘सुई धागा मेड इन इंडिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघांचीसुध्दा आपल्या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी सध्या प्रचंड लगबग सुरू आहे. दोघंही सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतायत.

आता लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. म्हणूनच अनुष्का आणि वरुणसुध्दा सिनेमातील आपल्या ममता आणि मौजी यांच्या व्यक्तिरेखेतच स्टार प्लसवरील कार्यक्रम ‘अद्भूत गणेश उत्सव’मध्ये उपस्थित राहून बाप्पाची आगळी-वेगळी सेवा करताना पाहायला मिळतील.

मिडीया रिपोर्ट्सनुसार अनुष्का आणि वरुण स्टार प्लसवर गणोशोत्सवादरम्यान ‘अद्भूत गणेश उत्सव’या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर बाप्पासाठी ते त्याच्या आवडीचे मोदकसुध्दा बनवणार आहेत आणि आरतीसुध्दा करणार आहेत. या कार्यक्रमाचं शुटींग नुकतंच पार पडलं आहे. या कार्यक्रमात या दोघांसोबतच टीव्ही सेलिब्रिटीसुध्दा उपस्थित राहणार आहेत. दिव्यांका त्रिपाठी,करिश्मा तन्ना यांसारखे सेलिब्रिटी चेहरे या कार्यक्रमात झळकणार आहेत. ‘अद्भूत गणेश उत्सव’ हा कार्यक्रम 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान म्हणजेच गणेशोत्सवाच्या काळात दाखविण्यात येणार आहे.

‘Impossible ते Unstoppable’ सुई धागा मेड इन इंडियाचा प्रवास उलगडतोय ट्रेलर

दरम्यान,ममता आणि मौजी म्हणजेच वरुण आणि अनुष्का ‘सुई-धागा’ सिनेमाच्या प्रोमोशनची कुठलीच संधी सोडत नाहीत. शरत कटारिया दिग्दर्शित सुई धागा मेड इन इंडिया हा सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ही कथा आहे, एका सामान्य व्यक्तीच्या असमान्य संघर्षाची आणि अथक प्रयत्नांची. मौजी आणि ममता आपल्या उद्योगातून एक भारतीय ब्रॅंड उदयास कसे आणतात, हे सिनेमात पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाद्वारे मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यात आले आहे.

Recommended

Loading...
Share