By  
on  

हृदयात समथिंग समथिंगचा उलगडला ट्रेलर

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा ट्रेलर मुंबईत एका शानदार सोहळ्यात नुकताच लाँच करण्यात आला. या सोहळ्यात सिनेमाचे कलाकार अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्यासह सिनेमाची संपूर्ण म्युझिक टिमही उपस्थित होती.

सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन या सोहळ्यात म्हणाले, "माझी मराठी सिनेमाची ही पहिली निर्मिती आहे. सिनेमा बनवण्याचे स्वप्न मी कित्येक वर्षांपासून पाहत होतो. एक निखळ मनोरंजन करणा-या कौटुंबिक विनोदी सिनेमाची निर्मिती करावी असं नेहमी वाटतं होतं. मग मी आणि शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, अतुल गुगळे या माझ्या तीन मित्रांनी मिळून हृदयात समथिंग समथिंग सिनेमाची निर्मिती केली. आता या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळणा-या प्रतिसादावरून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे वाटते आहे."

दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, "अशोकमामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न हृदयात समथिंग समथिंग सिनेमामूळे पूर्ण झाले. प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतीना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमूळे रंगायला खूप मदद झाली. आणि सिनेमा खूप मनोरंजक झाला आहे. "

https://youtu.be/2NjARKBvmZg

अशोक सराफ म्हणतात, "चांगली कथा, उत्तम दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार ह्यामूळे कोणत्याही धाटणीचा सिनेमा मनोरंजक होत जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हा सिनेमा आपल्या हृदयाजवळचा वाटेल, असा मला विश्वास वाटतो. "

सिनेमाचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर म्हणाले, " आजपर्यंत मी 31 मालिका आणि 29 सिनेमे लिहिले. हृदयात समथिंग समथिंग हा माझा 29 वा सिनेमा म्हणजेच 60 वी कलाकृती. वयाची साठी गाठणे जसे कौतुकाने साजरी करतात. तसाच हा माझ्या साठाव्या कलाकृतीचा कौतुक सोहळा आहे."

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’  सिनेमा  5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive