By  
on  

दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा फोन बंद झाला आणि अवतरले 'बॉईज-2'

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर,लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज-2' मध्येदेखील बॉईजची तीच धम्माल- मस्ती अनुभवता येणार आहे. मात्र या सिक्वेलची कल्पना कशी रंजक पध्दतीने सुचली याचा एक मजेशीर किस्सा नुकताच दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी शेअर केला आहे.

विशाल देवरुखकर सांगतात,“'बॉईज' च्या यशानंतर सिक्वलसाठी तितकाच ताकदीचा विषय निवडणदेखील गरजेचं होतं, त्यासाठी तोडीस तोड अशा विषयाच्या शोधात मी आणि लेखक ऋषिकेश कोळी होतो. परंतु, चार-पाच महिने होऊनदेखील आम्हाला काहीच सुचत नव्हतं. खुप हताश झालो होतो. मात्र, एकदा अचानक माझा फोन बंद झाला, आणि त्यातूनच 'बॉईज-2' ची हटके गोष्ट आम्हाला सापडली.”


विशाल देवरुखकर पुढे म्हणाले, “अवघ्या दोन-तीन तासांसाठीच बंद पडलेल्या फोनमुळे जर माझी इतकी वाईट अवस्था होऊ शकते, तर कॉलेज तरुणांसाठी त्यांचा फोन किती महत्वाचा असेल? असा प्रश्न विशाल मला पडला. मी त्वरित माझा हा विचार ऋषीकेश कोळीला बोलून दाखवला. ऋषिकेशनेदेखील त्याला पसंती देत 'बॉईज-2' चे लिखाण सुरु केले. अशा या अनावधाने सुचलेल्या 'बॉईज 2' सिनेमामध्ये शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या 'बॉईज' ची धम्माल पाहायला मिळणार आहे.

इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर, इरॉस इंटरनॅशनलद्वारे 'बॉईज-2' सिनेमाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.
किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे येत्या 5 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive