‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला आणि तरूणाईचा लाडका अभिनेता म्हणून बिरुद मिरवणारा अभिनेता सुव्रत जोशी आता सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतोय. ‘शिकारी’ सिनेमात हटके भूमिका साकारुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर त्याचा ‘पार्टी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. नेहमीच भारतीय पोशाखांत दिसणारा सुव्रत जोशीला पारंपारिक पोशाख किती प्रिय आहे हे नेहमीच त्याच्या सोशल मिडीयावरील फोटोंवरुन आपल्या लक्षात येते. तो नेहमीच भारतीय पोशाखातील आपले विविध लूक्स शेअर करत असतो.
धोतर हा भारतीयांचा पारंपारिक पोशाख असला तरी तो नेसून पार्टी करणं हे म्हणजे... नक्कीच तुमच्यासाठी काय...अशीच प्रतिक्रिया असणार. पण सुव्रतने मात्र आपली आवड आणि भारतीय असल्याचा अभिमान जपत धम्माल पार्टी केली. याबाबतचा धम्माल किस्सा त्याने सोशल मिडीयावर नुकताच शेअर केला.
सुव्रत म्हणतो, “भारतीय परिवेशात मला जेवढं सुटसुटीत वाटतं तेवढं मला कुठल्याच कपड्यात वाटत नाही...कित्येकदा मोठमोठ्या पार्ट्यांना मी धोतर नेसून गेलो आहे.. दिल्लीत तर शांग्रीला नावाच्या एका 5 स्टार हॉटेलच्या पबमधे धोतर नेसून जाण्यावरून एक मोठा वादही झाला होता. हॉटेल मॅनेजमेंटचं म्हणणं की आम्ही फक्त "फॉर्मल" कपडयामधेच प्रवेश देतो. माझं म्हणणं, धोतर आणि कुर्ता हे भारतीय लोकांचे "फॉर्मल" कपडेच आहेत,तुम्ही भारतात आहात त्यामुळे तुम्ही मला प्रवेश नाकरूच शकत नाही. असो. अर्ध्या तासानंतर आणि सर्वात उच्च पदावरील मॅनेजरपर्यंत गोष्टी गेल्यावर त्यांना मला प्रवेश द्यावाच लागला!”
सुव्रत पुढे सांगतो, “मला त्यांनी बूट मात्र घालायला सांगितले. तोवर त्या हॉटेलच्या पार्किंगचा गार्ड माझा युक्तिवाद ऐकून इतका खुश झाला होता की त्याने त्याचे बूट मला देऊ केले. मग धोतर,कुर्ताआणि ते बूट असा पोशाख करून मी दिल्लीतील त्या अत्यंत प्रतिष्ठित पबमध्ये "पार्टी" केली.”
https://www.instagram.com/p/BniQlFqAR4u/?taken-by=suvratjoshi
सुव्रत आपल्या या अनुभवाविषयी सांगताना सोशल मिडीयावर आवर्जुन नमूद करतो, “तुम्हाला याविषयी काय वाटते? तुमचा असा मित्र जो,भारतीय कपडे घालून पार्टीला येऊ शकेल त्याला टॅग करा आणि कुठलेही कपडे घालून "पार्टी" बघायला जा. पार्टी फिल्म बघताना कुठले कपडे घालायचे याचं बंधन नाही! ;)”