By  
on  

Bday Spl: अतुल कुलकर्णी यांना गीतांजली यांनी केलं होतं प्रपोज

मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठी सिनेसृष्टीतील मि.परफेक्शनिस्ट अतुल कुलकर्णी यांचा आज 10 सप्टेंबर हा वाढदिवस. 8 भाषा अवगत असणा-या अभिनेता अतुल कुलकर्णी सिनेमांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनय साकारत तितकंच संवेदनशीलतेने सामाजिक भानसुध्दा जपलं आहे.

चतुरस्त्र अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा अभिनय प्रवास आपण सर्वच जाणतो. एका मुलाखतीदम्यान अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजली यांच्यासोबतची आपली हटके लव्हस्टोरी उलगडली. ते सांगतात, “ मी आणि गीतांजली दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्रच शिकायला होतो. मी दुस-या वर्षात होतो. तर गीतांजली पहिल्या वर्षात होती. अर्थातच ती माझी ज्युनियर होती.आम्हा मराठी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होता. आम्ही नेहमी एकत्र फिरायचो. एकदा गीतांजलीने पुढाकार घेतला आणि मला लग्नासाठी विचारलं. इंडिया गेटवर आज जिथे आदोलनं होतात, तिथेच तिने माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मी थोडा वेळ घेतला आणि काही दिवसांतच तिला होकार कळवला.”

लग्नसंस्थेबद्दलची आपली मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अतुल म्हणतात, “मला लग्न करायचं नव्हतं. मी गीतांजलीला पहिल्यांदा विचारलं नाही कारण मला ती आवडली असली तरी मला तेव्हा लग्न करायचं नव्हतं. पण लग्नाबद्दलच्या विचारांमध्ये माझ्यात नंतर अनेक बदल झाले आहेत. लग्नसंस्थेबद्दल माझी काही मतं आहेत.”

60 पेक्षा जास्त सिनेमात काम केलेल्या अतुल यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. हे राम, चांदनी बार, खाकी, पेज 3, हॅप्पी जर्नी, रंग दे बसंती, वळू, नटरंग, एका प्रेमाची गोष्ट, राजवाडे अण्ड सन्स अशा सिनेमांमधून अतुल कुलकर्णी यांच्या भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive