By  
on  

Video : 'आधार' या मराठी सिनेमात काम करण्यासाठी अक्षय कुमारने 1 रुपयाही घेतला नाही- महेश टिळेकर

आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 52 वा वाढदिवस. आपल्याला अक्षय कुमारचं मराठी प्रेम तर सर्वज्ञात आहेच. पण तुम्हाला हे माहितीय का, अक्षय कुमारने मराठी सिनेमात कामसुध्दा केलं आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी 'आधार' नावाच्या मराठी सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी महेश टिळेकरांनी पार पाडली होती. या सिनेमातल्या अक्षयच्या कॅमिओच्या आठवणींना त्याच्या वाढदिवसानिमित्त महेश टिळेकर यांनी उजाळा दिला आहेत. पिपींगमून मराठीसोबत त्यांनी खास बातचित केली. 

महेश टिळेकर म्हणतात, "आपल्या सर्वांच्या लाडक्या अक्कीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 'आधार' सिनेमातल्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी मी जेव्हा अक्षयला विचारलं तेव्हा त्याने होकार तर दिलाच पण त्या कामाचा त्याने 1 रुपयासुध्दा घेतला नाही. इतकंच कशाला तर त्याच्यातल्या माणुसकीचं आणखी दर्शन मला पुढे घडलं, त्याच्यासाठी मी पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं होतं. पण त्याने तिथे राहण्यास साफ नकार दिला आणि आम्ही पुण्यातील ज्या बंगल्यात शूटींग करत होतो त्या बंगल्याच्या छोट्याशा खोलीत राहणं त्यानं पसंत केलं. थंड पाण्याने आंघोळही केली. जे आम्ही खायला दिलं ते खाल्लं. माझा निर्मात-दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न होता. त्याने मला खुप सहकार्य केलं. तो एक डाऊन टू अर्थ माणूस आहे. मी त्याचा ऋणी आहे." 

निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सांगितलेल्या किस्स्यामुळे बॉलिवूडच्या ह्या अॅक्शन खिलाडीच्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले. पिपींगमून मराठीतर्फे अक्षय कुमारला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ! 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive