By  
on  

सिध्दार्थ चांदेकरने गर्लफ्रेंड मितालीसोबतचा हा खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्च्या सध्या जोरदार सुरु आहेत. मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हिरो म्हणून ओळखला जाणारा सिध्दार्थ चांदेकर आणि 'उर्फी'फेम अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघंही एकमेकांसोबतचे फोटो नेहमी पोस्ट करत असतात. पण आज सिध्दार्थने गर्लफेंड मितालीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे आणि फोटोप्रमाणे त्याचं कारणसुध्दा खास आहे. आज मितालीचा वाढिवस  असून आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर हा खास फोटो शेअर सिध्दार्थ म्हणतो, "मी बॅटमॅनपेक्षासुध्दा जास्त तुझ्यावर प्रेम करतो. बरं झालं तुझा जन्म झाला आणि आपण भेटलो. नेहमीसारखीच हसतमुख राहा."

https://www.instagram.com/p/BnktwH4j0Jw/?taken-by=sidchandekar

 

हा गोड फोटो आणि हटके कॅप्शन देत सिध्दार्थने गर्लफ्रेंडला शुभेच्छा दिल्या. सोबतच त्याने #tinypanda वापरला असल्याने तो मितालीला लाडाने पांडा म्हणून संबोधतो असा अंदाज येत आहे.

उर्फी या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मिताली झी युवावरील फ्रेशर्स या मालिकेतसुध्दा झळकली होती. तरअग्निहोत्र मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या सिध्दार्थने क्लासमेट, झेंडा, बावरे प्रेम हे, वजनदार, ऑनलाईन बिनलाईन, गुलाबजामून आदी अनेक सिनेमांमधून नायक साकारला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive