By  
on  

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर आता हया पक्षात जाण्याची करतेय तयारी?

लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मांतोडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या गोपाळ शेट्टींपुढे मात्र उर्मिला तग धरु शकली नाही आणि तिला अपयश आलं. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने कॉंग्रेसला रामराम ठोकला.कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

कॉंग्रेसमध्ये असताना उर्मिलाने नेहमी भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, पण ठाकरे घराण्याच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे शिवसेनेवर कधीच टीकेची झोड उठवली नाही. तसंच सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासोबतसुध्दा उर्मिलाने फोनवरुन बातचित केली आहे, परंतु यामागे कोणताही राजकीय हेतू नसून फक्त वैयक्तिक कारणासाठी असल्याचं सांगितलं जात आहे.   त्यामुळे आता उर्मिला भगव्याची कास धरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive