सैराट सिनेमामुळे सर्वांना याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता जरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांच्या कुठल्याही आगामी सिनेमाची घोषणा नाहीय,तर त्यांनी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे. फक्त नागराजनीच नाही तर सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परशाने म्हणजे आकाश ठोसरनेसुध्दा त्यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वाणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1039481223918350336
[video width="640" height="352" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-11-at-10.32.06-PM.mp4"][/video]
मनसेतर्फे रिंकू,आकाश व नागराज यांना यंदा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची ही तयारी तर नाही ना, असा सवाल आता समोर उभा आहे. महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यावेळी म्हणाले, महाराष्ट्र चित्रपट सेनेचे काम बघूनच या सर्व कलाकारांनी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.