By  
on  

अक्षय कुमारने मुलगा आरवला दिल्या अशा शुभेच्छा

मुलाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक वडिलांसाठी एक खास दिवस असतो. त्याचे जन्माच्या क्षणापासून ते इथवर मोठे होण्यापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर तरळतो आणि डोळ्यात अभिमान दाटून येतो. मग यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील. सुपरस्टार अक्षय कुमारच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. प्रत्येक वडिलांप्रमाणे अक्कीनेसुध्दा आरवला खास आणि हटके अंदाजात सोशल मिडीयावर दोघांचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे खिलाडी कुमारच्या चाहत्यांनासुध्दा या शुभेच्छांवर सुंदर म्हणून प्रतिक्रिया देता आल्या.

शुभेच्छा देताना अक्की मुलाला म्हणतो,"उंचीमध्ये माझ्यापेक्षा मोठा. माझ्यापेक्षा स्मार्ट. माझ्यापेक्षा चांगला.  मला जे काही मिळालंय ते सर्व तुला मिळो, अशा मी तुला सदिच्छा यंदा देतो. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आरव." आरव आाणि अक्षयच्या खास सेल्फीमध्ये दोघंही बापबेटे अप्रतिम हसताना पाहायला मिळतायत.

https://www.instagram.com/p/BnvIQQSlXXY/?utm_source=ig_embed

अक्षयची पत्नी अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकलनेसुध्दा अक्षयच्या या पोस्टला रिपोस्ट करत हॅप्पी बर्थडे आरव तुला १६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटलं आहे.

तुम्हाला हे माहितच असेल, आरव हा शिक्षणासाठी सध्या लंडनमध्ये आहे. आरवसुध्दा अक्षयसारखा  मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे.काही दिवसांपूर्वी स्टार किडच्या पदार्पणाच्या चर्चेत अक्षयच्या मुलाचं नाव घेण्यात आलं होतं. तेव्हा अ७यने सांगितलं आधी आरव शिक्षण पूर्ण करेल आणि नंतर त्याच्या करिअरची दिशा ठरवेल. त्याला जे करायचं आहे तो त्याच्या सर्वस्वी निर्णय असेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive