2 October Special: अभिनयातच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत हे कलाकार

By  
on  

आज महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. यानिमित्ताने सगळीकडे सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वच्छता या मुल्यांना उजागर केलं आहे. गांधीजींनी स्वच्छता या मुल्याचा जोरदार पुरस्कार केला. मराठी कलाकारांंनीही नेमकं हेच लक्षात ठेवत अनेकदा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

नेहा शितोळे: नेहा शितोळेने अलीकडेच बीच क्लिनिंगमध्ये सहभाग नोंदवला होता. नेहा शितोळेने 'मुंबई सिटीझन फोरम'च्या स्वयंसेवकांसोबत काम करून स्वतःमधली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दाखवून दिली होती.

 

केतकी चितळे: केतकी चितळेने एपिलेप्सीने पिडित असलेल्या व्यक्तींसाठी काम करून समाजभान जपलं आहे.

प्राजक्ता माळी: प्राजक्ता माळी आरे जंगल बचावासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शवताना दिसून येते.

 

स्मिता तांबे: अभिनेत्री स्मिता तांबेही गांधी जयंतीच्या निमित्ताने समाजभान जपलं आहे. स्मिताने आज मढ आर्यलंड इथे बीच क्लिनिंग मोहिमेत सहभाग नोंद्वला. 

किशोरी शहाणे: अभिनेत्री किशोरी शहाणेंनीही अलीकडेच बीच क्लिनिंग उपक्रमात सहभाग नोंदवला होता.

 

Recommended

Loading...
Share