प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि प्रसिध्द व्यक्तींबाबत जाणून घ्यायला खूप आवडतं. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ते कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या नव्या कार्यक्रमामध्ये.
प्रेक्षकांना नक्कीच हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे कारण पाहुण्यांबरोबरच कार्यक्रमामध्ये असणार आहेत इरसाल नमुने जे या पाहुण्यांशी गप्पा तर मारणारच आहेत पण त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोदाने प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे करणार आहे.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1036859104810041344
अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रसिध्द व्यक्तीमत्वांसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. कार्यक्रमामध्ये कलर्स मराठीवरील प्रसिध्द मालिकांमधील लाडक्या सासू म्हणजेच घाडगे & सून मधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईक तर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत. तेव्हा या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे म्हणाले, “अस्सल पाहुणे इरसाल नमुने हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे. कारण विविध क्षेत्रात यशस्वी झालेले व्यक्ती या कार्यक्रमामध्ये येणार असून त्यांच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते परंतु या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या अंतरंगाचा शोध प्रेक्षकांना घेता येणार आहे.थोडं मिश्कील, थोडं गंभीर असं मिश्र स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल”.
तेव्हा बघायला विसरू नका ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’- इथे गप्पांना नसणार तोटा कारण पाहुणा असणार मोठा आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून गुरु – शुक्र रात्री 9.30 वा. फक्त कलर्स मराठीवर.