By  
on  

एका लग्नाची गोष्ट सांगतोय,‘शुभलग्न सावधान’चा ट्रेलर

‘शुभलग्न सावधान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ट्रेलर पाहता तो एका प्रेमाची अजब कहाणीसारखा वाटतोय. यात एका लग्नाची आधुनिक गोष्ट पाहायला मिळतणार आहे. श्रृती मराठे आणि सुबोध भावे ही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकतेय. लग्नसंस्थेवर एका वेगळ्या पैलूने भाष्य करणारा हा सिनेमा आहे.

लग्नसमारंभ म्हटलं की संपूर्ण कुटुंबात लगीनघाईला जोरदार सुरुवात होते. लग्नसोहळ्याची धम्माल लग्न जुळण्यापासून ते डोक्यावर अक्षतापडेपर्यंत सुरूच असते. हा अनुभव प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी घेतोच. हे क्षण फक्त जपण्यासाठीच असतात. अशीच एका लग्नाळू जोडप्याची अनोखी कहाणी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

श्रृती आणि सुबोधबरोबरच सिनेमात सिनेमात निर्मिती सावंत, गिरीश ओक, विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

https://youtu.be/_nuOU1Zs718

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाच्या निर्मितीची धुरा फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांनी सांभाळली आहे. ‘शुभलग्न सावधान’येत्या 12 ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ सिनेमासाठी सर्व प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive